Ad will apear here
Next
धनू, मकर, कुंभ राशीला साडेसाती; काही उपाय, उपासना (उत्तरार्ध)


शुक्रवार, दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी सकाळी नऊ वाजून ५३ मिनिटांनी शनिमहाराज मकरेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे त्या वेळेपासून वृश्चिकेची साडेसाती संपून कुंभेची साडेसाती सुरू होते आहे. अशा रीतीने आता धनू, मकर आणि कुंभ या तीन राशींना साडेसाती सुरू असणार आहे. त्या निमित्ताने, पालघरचे ज्योतिष मार्गदर्शक सचिन मधुकर परांजपे यांनी दिलेली माहिती आणि सुचवलेल्या उपासना... 
..........
उपासनेविषयी बोलण्याआधी शनी या दैवताविषयी एक गोष्ट लक्षात घ्या. शनी हे दैवत उग्र, क्रूर, न्यायनिष्ठुर, स्पष्ट, मितभाषी, कृतिजन्य व श्रेष्ठ आहे. किरकोळ उपाय-उपासना केल्या म्हणजे त्याच्या पीडांची तीव्रता कमी होईल असा गैरसमज चुकूनही बाळगू नका. त्याच्या उपाय-उपासनेत कर्मप्रधानतेला अधिक महत्त्व आहे. साडेसातीतली तुमची वागणूक ही जितकी श्रद्धायुक्त, विनयी (Down to earth), निर्व्यसनी, नैतिक असेल तितक्या प्रमाणात ते उपाय लाभदायक ठरतात. एकीकडे अयोग्य वर्तन करून दुसरीकडे शनिमहाराजांसमोर नाक घासून तेलाचा अभिषेक कराल आणि पीडानिवारणाची अपेक्षा बाळगाल, तर ते सर्वत: चूक ठरेल हे विसरू नका... काही महत्त्वाच्या उपाय-उपासना पुढीलप्र्माणे आहेत. त्यापैकी ज्या जमतील-रुचतील त्या ‘नित्यनेमाने’ आणि श्रद्धेने कराव्यात ही विनंती....

- साडेसाती/अडीचकी सुरू असताना शनिवारी कोणत्याही स्वरूपात/कोणत्याही परिस्थितीत मांसाहार/मद्यपान करू नये. या गोष्टींचा श्रीशनिमहाराजांना तिटकारा आहे. हे बंधन शनिवार सूर्योदयापासून रविवार सूर्योदयापर्यंत पाळावे. रात्री १२नंतर इंग्रजी तारीख बदलते, वार नाही. तो दुसऱ्या दिवशी सूर्योदयालाच बदलतो, ते विसरू नये...

- साडेसातीत एक तर मारुतीची किंवा श्री शनीची उपासना यापैकी एकच काय ती करावी. दोन्ही उपासना एकत्र करू नयेत. मारुतीची उपासना करायची असेल, तर वरील उपायांसोबत रोज सकाळी मारुती स्तोत्राचे वाचन करावे किंवा श्रीहनुमानचालिसा/श्री बजरंगबाण किंवा हनुमान वडवानल स्तोत्र यांचे वाचन करणेही लाभदायक असेल. शनिवारी संध्याकाळी अगरबत्ती लावून मारुतीचे स्मरण करून रामचरितमानसधील श्रीसुंदरकांडाचे वाचन करणेही अति लाभदायक असते.

- श्री शनीचीच उपासना करायची असेल तर रोज सकाळी व संध्याकाळी

(अ) ॥ ॐ नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम ।
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम

या शनिमंत्राचा किमान १०८ वेळा जप करावा किंवा मग...

(ब) ॥ ॐ सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिय:
मंदचार प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि: ॥

या पीडाहरण मंत्राचा १०८ वेळा जप करावा

(क) शनिवारी संध्याकाळी काळ्या रंगाची घोंगडी किंवा ब्लँकेटवर पश्चिमाभिमुख बसून समोर एक चंदन अगरबत्ती व तिळाच्या तेलाचा दिवा लावून एकाग्रचित्ताने व शांतपणे-सलगतेने ‘श्रीशनिमहात्म्य’ पठण करावे... शनिमहात्म्य वाचन एकदा सुरू केल्यावर ते मध्येच खंडित करू नये. म्हणजे तुम्ही शनिमहात्म्य वाचन करण्यापूर्वी ते दर शनिवारी करता येईलच, याची खातरजमा करून घ्यावी.

- साडेसातीच्या काळात स्त्री-पुरुषांनी व्यभिचार, वेश्यागमन किंवा परस्त्रीगमन आणि एकंदरीत अनैतिक संबंधांपासून कटाक्षाने दूर रहावे. त्या प्रकाराचे दणके शारीरिक, मानसिक आणि प्रामुख्याने सामाजिक पातळीवर जबरदस्त बसतात. हाच नियम भ्रष्टाचारालाही लागू होतो.

- शनीच्या साडेसाती/अडीचकीच्या काळात धनसंपत्तीच्या बाबतीत दीर्घकालीन व सुरक्षित गुंतवणूक करण्यावर अधिकाधिक भर द्यावा. गरजूंना अन्नदान करावे. सेवाभावी संस्थांना सत्पात्री दान करावे..

- सातमुखी, दहामुखी आणि अकरामुखी रुद्राक्ष संस्कारांसह धारण करणे लाभदायक आहे. या रुद्राक्षास मद्यपान न करणे, परस्त्रीगमन न करणे व जुगार न खेळणे ही तीन बंधने कटाक्षाने पाळावीच लागतात. रुद्राक्ष हवे असल्यास अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत (०९८२३१ २४२४२) या क्रमांकावर संपर्क साधावा.

- शनी हे दैवत स्निग्धताप्रिय दैवत असल्याने इतरांशी वागताना, बोलताना विनय, मृदुता आणि विनम्रपणे वागावे. साडेसातीच्या काळात इतरांचे वाद मिटवणे, जामीन राहणे, गॅरेंटर राहणे असल्या गोष्टीत पडू नये. नसत्या भानगडी मागे लागण्याची शक्यता असते. साडेसातीच्या काळात उद्योगशील राहावे, आळस टाळावा.

साडेसाती सुरू असताना (व नसतानाही) श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे अधूनमधून जाऊन शनिमहाराजांचे प्रार्थनापूर्वक दर्शन घेऊन यावे. अनवधानाने झालेल्या अपराधांची क्षमा मागावी.

- सचिन मधुकर परांजपे (पालघर)

(या लेखाचा पूर्वार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZFCCH
Similar Posts
धनू, मकर, कुंभ राशीला साडेसाती; काही उपाय, उपासना (पूर्वार्ध) शुक्रवार, दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी सकाळी नऊ वाजून ५३ मिनिटांनी शनिमहाराज मकरेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे त्या वेळेपासून वृश्चिकेची साडेसाती संपून कुंभेची साडेसाती सुरू होते आहे. अशा रीतीने आता धनू, मकर आणि कुंभ या तीन राशींना साडेसाती सुरू असणार आहे. त्या निमित्ताने, पालघरचे ज्योतिष मार्गदर्शक सचिन
अडीचकी म्हणजे काय रे भाऊ? साडेसाती ही संकल्पना आता आपल्यापैकी अनेकांना परिचयाची आहेच; पण ‘अडीचकी’ म्हणजे एक्झॅक्टली काय, हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. शनिमहाराज प्रत्येक राशीत साधारणपणे त्यांच्या मंद गतीनुसार अडीच वर्षे भ्रमण करून मग पुढील राशीत प्रवेश करत असतात. त्यांचे हे राशीभ्रमण जेव्हा तुमच्या अगोदरच्या+तुमच्या+तुमच्या नंतरच्या अशा तीन राशीत मिळून (२
राशी आणि स्वभावांच्या गमतीजमती सिंह रास ही राजयोगी रास म्हणतात. सिंहेची मंडळी थोडी आक्रमक, हुकूमशाही वृत्तीची वगैरे खरं असलं, तरी त्यांचा मूळ स्वभाव हा अत्यंत शांतताप्रिय, सलोखा ठेवणारा आणि शिस्तप्रिय असतो. सिंह मंडळी कधीच भांडकुदळ आणि कुचाळक्या करणारी नसतात.
नऊ फेब्रुवारीच्या मकर षट्ग्रहीचा परिणाम सर्व राशींवर नऊ फेब्रुवारीच्या मकर षट्ग्रहीचा परिणाम साधारणपणे ३० मार्चपर्यंत असू शकतो. मकर राशीत रवी, शनी, गुरू, बुध, शुक्र आणि चंद्र एकत्र येत आहेत. मकर रास कालपुरुषाच्या कुंडलीत दशम (कर्म) स्थानी येते आहे. त्यामुळे एकंदरीत व्यवहारिक पातळीवर कोणत्याही कारणाने उद्योगधंदे, व्यापार यावर थोडा निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language